एक आनंदी व्यक्तिमत्व, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नेते व माजी सभापती परिवहन समिती सोलापूर-लिंगायत समाजाचे ज्येष्ठ नेते श्री. विजयकुमार हत्तुरे. तसेच संस्थापक अध्यक्ष, जय हो वर्कर्स युनियन, सोलापूर. विजयकुमार हत्तुरे यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. श्री.विजय कुमार हत्तुरे यांनी दुर्बल घटकांना शैक्षणिक मार्गदर्शन केले, भारत सरकार व महाराष्ट्र शासनाचे विविध उपक्रम राबवले, तसेच शिक्षणापासून वंचित राहिलेल्या तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या व शेती व आधुनिक साधनांचा अवलंब करून शेतीवर लक्ष केंद्रित करून यश मिळवले. सोलापूर येथील मजरेवाडी हद्द व लिंगायत स्मशानभूमीसाठी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलन करून सोलापूर महापालिकेकडून ३ एकर १ गुंठा जागा मिळवली. त्या ठिकाणी स्मशानभूमी सुधारण्यासाठी दीड कोटींची कामे पूर्ण झाली. मुलतानी बेकरी ते श्री सिद्धेश्वर साखर कारखाना 40 लाख पथ दिव्याचे काम. नियोजित महात्मा बसवेश्वर रक्तपेढीचे काम सुरू आहे. लिंगायत स्वतंत्र धर्माने दिल्ली, सोलापूर, पुणे येथे मोर्चाचे नेतृत्व केले आहे.